gogate-college-autonomous-updated-logo

कोंकण विभाग पुरुष हँडबॉल स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) पुरुष हँडबॉल संघ अजिंक्य

मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि ए. एस. सी. लांजा महाविद्यालय, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ०६ ते ०७ डिसेंबर २०२४ रोजी कोंकण विभाग पुरुष हँडबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद व सुवर्ण पदक प्रात केले. सुवर्ण पदक प्राप्त पुरुष हँडबॉल सहभागी संघामध्ये
(१) सौरभ झगडे
(२) अथर्व फडणीस
(३) पार्थ पाटील
(४) आदित्य वेरुळकर
(५) सोहम सावंत
(६) रोहन सुर्वे
(७) सुयोग शिंदे
(८) आर्यन नेवरेकर
(८) विवेक वेद्रे
(१०) चेतन जाधव
(११) सहील कदम
(१२) आर्यन कांबळे
(१३) गौरव चव्हाण
(१४) हर्ष मयेकर
या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले होते.

सुवर्ण पदक प्राप्त विजेत्या संघातील विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, श्री. सुमित पडेलकर यांचे मार्गदर्शन आणि श्री. मनिष कुवळेकर यांचे सहकार्य लाभले. कोंकण विभाग पुरुष हँडबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक व विजेतेपद प्राप्त संघातील विद्यार्थी खेळाडूना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा.कल्पेश बोटके सर्व प्राध्यापक सहकारी,कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.