gogate-college-autonomous-updated-logo

कोंकण विभाग आणि मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल स्पर्धा- २०२३ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलांच्या संघास सुवर्ण व कांस्य पदक

कोंकण विभाग आणि मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल स्पर्धा- २०२३ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलांच्या संघास सुवर्ण व कांस्य पदक

दि. १८ डिसेंबर रोजी ए.सी.एस. लांजा महाविद्यालय आणि दि. २१ डिसेंबर/२०२३ रोजी सी.के.टी. महाविद्यालय, पनवेल येथे अनुक्रमे कोंकण विभाग आणि मुंबई विद्यापीठ पुरुष हँडबॉल स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलांच्या संघास सुवर्ण पदक व कांस्य पदक प्रात केले. स्पर्धेतील सहभागी व पदक विजेते विद्यार्थी- पार्थ पाटील, सौरभ झगडे, आदित्य वेरुळकर, सोहम सावंत, अथर्व कारेकर, अथर्व घाणेकर, रोहन सुर्वे, शिंदे सुयोग, शिवलकर श्रीपाद, नेवरेकर आर्यन, वेड्रे विवेक, श्रेयस काजरेकर या विद्यार्थ्यांनी कोंकण विभाग व मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन पुरुष हँडबॉल स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले होते.

पदक प्राप्त विजेत्या संघातील विद्यार्थ्यांना क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन आणि माजी हँडबॉल विद्यार्थी मनिष कुवळेकर यांचे सहकार्य लाभले. स्पर्धेतील पदक विजेत्या संघातील यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव सतीशजी शेवडे, जिमखाना कमिटी अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही विभागांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ विनोद शिंदे, सर्व सहकारी प्राध्यापक, कर्मचारी, सेवक वर्गाने शुभेच्छा दिल्या.

Comments are closed.