गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे आरोग्यविषयक व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातील पॅथॉलॉजिस्ट तसेच ग्रांट गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेज येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सरोज बोलदे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध समस्या व उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. आरोग्य व जीवनशैली, आहारातील समतोल, मानसिक संतुलन, बौद्धिक प्रगती तसेच कर्करोग जनजागृती, अवयवदान, व्यसनाधीनतेपासून सुटका असे विषय त्यांनी हाताळले. विद्यार्थ्यांशी विशेष हितगुज करित त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यासाठी संभाव्य उपयायोजना याविषयीही भाष्य केले. यावेळी विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या नियोजानाकरिता प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख प्रा. रश्मी भावे आणि विभागातील सर्व प्राध्यापकांनी मेहनत घेतली.