gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता दि. २५ नोव्हेंबर रोजी कॅंपस इंटरव्ह्यू

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलद्वारे भारतातील प्रतिथयश अशा खाजगी क्षेत्रातील आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता ‘सेल्स ऑफिसर’ या पदांकरिता कॅंपस इंटरव्ह्यूचे दि. २५ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजन करण्यात आले आहे.

सदर मुलाखातींकरिता २०१६-१७, २०१७-१८ आणि २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांत पदवी प्राप्त झालेले कोणत्याही शाखेतील विद्यार्थी उपस्थित राहू शकतात. निवड प्रक्रियेमध्ये सायकोमेट्रिक टेस्ट, इंग्लिश टेस्ट, ऑनलाइन टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू इ. बाबींचा समावेश असेल. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत मोबा. ९४२११४२५२९ यांचेशी संपर्क साधावा; असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.

Comments are closed.