गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे पहिल्या दोन प्लेसमेंट ड्राईव्हच्या आयोजनानंतर दि.१९ व २० जुलै२०१९ रोजी तिसऱ्या ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे. सदर कॅम्पस इंटरव्ह्यू आय.सी.आय.सी.आय. बँकेकरिता एन.आय.आय.टी.मार्फत ‘सिनिअर ऑफिसर’ या पदाकरिता घेण्यात येतील.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून सन २०१६-१७ पासून २०१८-१९ पर्यंतच्या शैक्षणिक वर्षामध्ये कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेले विद्यर्थी उपस्थित राहू शकतात. तसेच इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यानाही सदर संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. १९ रोजी सकाळी १०.०० वाजता मुख्य इमारत, सेमिनार हॉल येथे सर्व मूळ कागदपत्रे, पॅन कार्ड, आधार कार्ड, दोन फोटो इ. घेऊन उपस्थित राहावे. अधिक माहितीकरिता समन्वयक डॉ. रुपेश सावंत (मोबा.- 9421142529) यांचेशी संपर्क साधावा.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे उपलब्ध करून दिलेल्या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.