गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि एन.आय.आय.टी., मुंबई यांच्या संयुक्तविद्यमाने मे महिन्यात घेण्यात आलेल्या दुसऱ्या कॅम्पस ड्राईव्हमधून ११ विद्यार्थ्यांची निवड होऊन त्यांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्लेसमेंट अगोदरचे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग ऑपरेशन्स प्रशिक्षण एन.आय.आय.टी., पुणे व मुंबईच्या प्रशिक्षण केंद्रात सुरु झाले आहे. ४५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर त्यांना आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या विविध शाखांमधून सिनिअर ऑफिसर या पदावर सामाऊन घेण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानली परांजपे, साहिल वायंगणकर, गीतेश शेट्ये, साहिल रसाळ, प्रथमेश कदम, श्रेयसी सिरसाट, श्रिया जैतपाळ, रेखा राठोड, सेजल सावंत, आकाश कुलकर्णी आणि प्रतिक जेठवा या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यशस्वी विद्यार्थी आणि महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.