गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतील विज्ञान मंडळ, मराठी विज्ञान परिषद, निसर्ग मंडळ या विज्ञान विषयक उपक्रमांच्या विद्यमान वर्षीच्या कार्यक्रमांची सुरुवात नुकतीच संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्राणीशास्त्र संशोधक श्री. प्रेमसागर मेस्त्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्याक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळ समन्वयक डॉ. मयूर देसाई यांनी केले. याप्रसंगी श्री. मेस्त्री यांनी ‘गिधाड संरक्षण आणि संवर्धन’ या विषयावर व्याख्यान दिले. गिधाडांच्या विविध प्रजाती, पर्यावरण, संरक्षणातील त्यांची भूमिका आणि गिधाडांच्या विविध प्रजाती, पर्यावरण संरक्षणातील आवश्यकता यावर विस्तृत विवेचन केले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी निसर्गसंवर्धन उपक्रमास अशाप्रकारे सहभागी होऊ शकतात. याबद्दल मार्गदर्शक केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘व्यवसाय आणि आवड या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर तुम्ही नवीन गोष्टी सध्या करू शकता’ असे सांगितले. आणि सर्वांना वर्षभरातील पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. योगेश गुरव आणि श्री. रूपम भारद्वाज हे गिधाड संरक्षण प्रकल्पातील श्री. मेस्त्री यांचे सहकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. श्रद्धा सुर्वे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.