गोगटे जोगळेकर महाविद्यालयामद्धे दि. १५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा साजरा करण्यात आला. महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्याक्रम संपन्न झाला. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. परेडचे संचलन लेफ्ट. डॉ. स्वामिनाथन भट्टर यांनी केले. क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्ट. प्रा. दिलीप सरदेसाई यांनी केले. ज्येष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी, सेवकवर्ग आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यानंतर सहकार या वार्षिक अंकाचे पहिले भित्तीपत्रक प्रकाशन आणि ग्रंथप्रदर्शनाचे प्रकाशन कै. बाबुराव जोशी ग्रंथालय येथे, मुख्य इमारत येथे गणित व आय.टी. विभागाचे भित्तीपत्रक प्रकाशन, विद्यार्थिनी विश्रामिका येथे ‘आपण साऱ्याजणी’ याचे महिला विकास कक्षातर्फे प्रकाशन प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर राधाबाई शेट्ये सभागृहात मुख्य कार्यक्रम आणि देशभक्तीपर समूहगीत सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपस्थितांना डॉ. अरविंद कुलकर्णी यांनी संबोधित केले.
समूहगीत स्पर्धेत वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालायातील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना प्रमाणपत्र प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निधी पटवर्धन आणि प्रा. सुप्रिया टोळ्ये यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा. सुप्रिया टोळ्ये आणि प्रा. क्षमा पुनस्कर यांनी केले. विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.