रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर (स्वायत्) महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यादिनानिमित्त ‘सायबरशिक्षा – सायबरसुरक्षा’ या अभियानांतर्गत विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन (Two-Factor Authentication) या महत्त्वपूर्ण सायबर सुरक्षा तंत्रज्ञानावरील मार्गदर्शनाने झाली. विद्यार्थ्यांना त्यांच्या सोशल मीडिया खाते, ई-मेल आयडी तसेच बँक खात्यांची सुरक्षितता वाढविण्यासाठी या तंत्राचा उपयोग कसा होतो, याची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
सायबर सुरक्षा जनजागृती अधिक आकर्षक करण्यासाठी महाविद्यालयाच्या परिसरात ‘सायबर अवेअरनेस सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी उत्साहाने या सेल्फी पॉईंटवर छायाचित्रे काढून सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामुळे जागरूकतेचा संदेश अधिक व्यापक पसरला.
अशाप्रकारचे सायबर सुरक्षा तंत्रज्ञानावरील उपक्रम राबवल्याने भविष्यात येणारे संभाव्य धोके टाळू शकतो’, असे प्रतिपादन यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आणि असे उपक्रम भविष्यात घेण्याचे आश्वासन देखील दिले.
सदर उपक्रम क्विक हिल फाऊंडेशन पुणे आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय(स्वायत्त), रत्नागिरी यांच्या संयुक्तविद्यमाने घेण्यात आला तसेच या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यानी सुरक्षित इंटरनेट वापराची शपथ घेतली. कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग व महाविद्यालयीन कर्मचारी मिळून सुमारे ६०० जणांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. श्री. केतन जोगळेकर यांनी केले. या उपक्रमासाठी सहभागी २० सायबर वॉरियर्सनी कसून मेहनत घेतली.
असे उपक्रम राबवल्याने भविष्यात येणारे संभाव्य धोके टाळू शकतो असे प्रतिपादन यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आणि असे उपक्रम भविष्यामद्धे घेण्याचे आश्वासन देखील दिले.







Visitors Online : 2