दि. ११, १२ नोहेंबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठ, मुंबई व आर. डी. नॅशनल महाविद्यालय बांद्रा, मुंबई येथे मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन पुरुष वेट लिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत कु. पार्थ हेमंत जाधव गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त); एफ.वाय.बी.ए. या विद्यार्थ्याने मुंबई विद्यापीठ पुरुष वेट लिफ्टींग ५५ किलो वजनी गटात रौप्य पदक प्राप्त केले. कु. पार्थ जाधव या विद्यार्थ्याला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ विनोद शिंदे तसेच श्री. हेमंत जाधव आणि श्री. वैभव हंजनकर यांचे मार्गदर्शन लाभले तर जिल्हा वेटलिफ्टींग असोशिएशनचे सहकार्य लाभले.
मुंबई विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झालेल्या कु. पार्थ जाधव या विद्यार्थ्याचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे. जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. |