gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आंतराष्ट्रीय आवर्त सारणीवर्षानिमित्त व्याख्यान संपन्न

आंतराष्ट्रीय आवर्त सारणीवर्षानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. २१ सप्टेंबर रोजी रसायनशास्त्र विभाग आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुधाकर आगरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. आगरकर यांनी ‘१८६९ ते २०१९ या कालखंडातील आवर्त सारणीचा विकास’ या विषयावर आपले विचार मांडले. तत्पूर्वी त्यांनी रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी स्वहस्ते लिहिलेल्या ११८ मूलद्रव्यांच्या माहितीचे प्रकाशन केले. यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी १८६९ पासून लागलेल्या सर्व मूलद्रव्यांचा शोध, त्यांच्या रंजक कथा, मूलद्रव्यांची आवर्त सारणीतील मांडणी, विविध वैज्ञानिकांचे योगदान याविषयी सविस्तर आणि सुबोध शब्दांत माहिती दिली.

प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी ‘आवर्त सारणीचे मानवी जीवनातील महत्व’ सांगितले. तर रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिलिंद गोरे यांनी ‘आवर्त सरणीचा संक्षिप्त इतिहास’ विषद केला.

डॉ. आगरकर यांच्या हस्ते मराठी विज्ञान परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांचा तर डॉ. अपर्णा कुलकर्णी यांना मुंबई विद्यापीठाच्या पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मेघना म्हादये यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. श्रुती वाघधरे यांनी केले. या कार्यक्रमाला विभागातील प्राध्यापक आणि पदवी तसेच पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.