gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागामार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबीनार संपन्न

‘फिनिक्स २०२१ आंतरराष्ट्रीय वेबीनार’ या उपक्रमाअंतर्गत येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील संगणकशास्त्र विषयातील संशोधन आणि करिअर संधी या विषयावर आधारित दोन दिवसीय वेबीनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र आणि गोवा येथील विविध महाविद्यालयातील दोनशेहून अधिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या वेबिनारचा लाभ घेता आला.

महाविद्यालयीन पातळीवरून आंतरराष्ट्रीय सेवा संधी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन योजनांच्या निधीसाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय सदैव क्रियाशील राहिलेले आहे. महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागाने विद्यमान कालखंडात कोकणातील विद्यार्थ्यांना संशोधन आणि करियर या विषयासंबंधी अधिक प्रेरणा मिळावी यासाठी आंतरराष्ट्रीय उपक्रमाचा भाग असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मेहता इन्स्टिट्यूटमधील डॉ. रसिका मल्या, गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. प्रशांत लोंढे, कॅनडास्थित टीसीएसचे श्री. उमेश अणावकर, मोबिसॉफ्ट इन्फोटेक, पुणे येथील श्री. श्रेयस रानडे यांनी या वेबीनारअंतर्गत मार्गदर्शन केले. आयओटी, संगणकशास्त्रातील संशोधन संधी, मध्यकालीन कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञानाचे प्रवाह व संगणक कार्यक्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता या अत्यंत महत्वाच्या विषयांवर या वेबीनार अंतर्गत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.

संगणकशास्त्र विभागाने या उपक्रमातील पदव्युत्तर विभागातील शोधनिबंध स्पर्धादेखील आयोजित केली. यास्पर्धेत देखील एकूण ३० शोधनिबंधांचे सादरीकरण झाले. पदव्युत्तर विभाग एक मधून विशाल सावंत आणि पदव्युत्तर विभाग दोन मधून प्रसाद पुसाळकर हे विद्यार्थी विजेते ठरले. स्पर्धेचे परीक्षण श्री. श्रेयस रानडे यांनी केले. अद्ययावत तंत्रज्ञानावर स्पर्धेमध्ये सखोल लेखन करण्यात आले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी संगणकशास्त्र विभागाच्या या विद्यार्थी प्रेरक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. विवेक भिडे यांनीही सर्वांचे अभिनंदन केले.

आंतरराष्ट्रीय वेबीनारच्या यशस्वी संयोजनात विभागप्रमुख प्रा. अनुजा घारपुरे, प्रा. सनिल सावले, प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे प्रा. केतन जोगळेकर, प्रा. श्रुती धमस्कर, प्रा. शलाका आग्रे, प्रा. सपना बाणे, श्री. विनोद रजपूत, अंकिता बारगुडे यांचे सहकार्य लाभले. प्रा. चेतन गोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Comments are closed.