gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘आयएसओ मानांकन’ कार्यशाळा संपन्न

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयएसओ मानांकन कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. शिक्षण, व्यवस्थापन, बँकिंग, सार्वजनिक सेवा अशा विविध क्षेत्रातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आस्थपानांचे आयएसओ मानांकन करून प्रमाणपत्र दिले जाते. यापूर्वी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान विभाग आणि ग्रंथालयाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांना ‘आयएसओ : ९००१’ या विषयी माहिती व्हावी या हेतूने महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेकरिता सोलापूरच्या यश कन्सल्टन्सीचे लिड ऑडिटर ओंकार पत्की यांनी साधनव्यक्ती म्हणून काम पाहिले.

या कार्यशाळेत श्री. पत्की यांनी ‘आयएसओ : ९००१’, त्याची आवश्यकता,  अर्ज भरण्यापासून ते प्रमाणीकरणाची प्रक्रिया, तत्पूर्वी करावयाची कार्यवाही ‘आयएसओ’चे फायदे इ. अनेक पैलूंवर मार्गदर्शन केले. आयएसओ ही संस्था जिनिव्हा येथे स्थापन झाली. आयएसओ ९००१ मध्ये नमुना, विकास, उत्पादन, उभारणी व सेवा याबद्दल गुणवत्तेची ग्वाही देण्यात येते, आयएसओ मानांकानामुळे भविष्यात महाविद्यालय,  विद्यार्थी यांना अनेक फायदे मिळू शकतात, असेही ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.पी.पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, आय.क्यु.एस.सी. समन्वयक आणि कला शाखा उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई, वाणिज्य शाखा उपप्राचार्य  डॉ. यास्मिन आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेत महाविद्यालयातील विविध विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला.

 

Comments are closed.