gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जागतिक खारफुटी दिनानिमित्त आयोजित ‘वेबीनार’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि लायन्स क्लब यांचा संयुक्तविद्यमाने प्रतिवर्षी ‘जागतिक खारफुटी दिन’ सर्वत्र साजरा केला जातो. परिसंवाद, प्रदर्शन, स्पर्धा, क्षेत्रभेट इ. उपक्रमांचे आयोजन यानिमित्ताने सर्वत्र केले जाते. महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग आणि लायन्स क्लब, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने या वेबीनारचे आयोजन करण्यात आले. डॉ. निरंजना चव्हाण, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे ‘खारीफुटी वने आणि मानवाची सुरक्षितता’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन गुगल मिटच्या मध्यामातून करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विभागप्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी सर्वसामान्यांमध्ये खारफुटी वनांबद्दल जागरूकता निर्मांण करण्याचा उद्देश या कार्यक्रमाच्या आयोजनाने सफल होईल असे सांगितले. तसेच वनस्पतीशास्त्र विभागामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. लायन्स क्लब, रत्नागिरीच्या अध्यक्षा अॅड. शबाना वस्ता यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयातील पर्यावरण विषयक विविध उपक्रमांच्या आयोजनात लायन्स क्लब नेहमीच सहकार्य करेल असे सांगितले.

महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. पी.पी. कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल वनस्पतीशास्त्र विभागाचे अभिनंदन केले. तसेच यानिमित्ताने कोकणातील वैशिष्ठ्यपूर्ण खारफुटी वनस्पती आणि परिसंस्था यांचे महत्व अधोरेखित होईल असे प्रतिपादन केले.

डॉ. निरंजना चव्हाण यांनी आपल्या भाषणात कोकण किनारपट्टीवरील खारफुटी वनस्पती, प्रजातींची विविधता, सध्यस्थिती आणि त्यांना असलेले धोके यावर भाष्य केले. खारफुटी वनस्पतींचे समूह किनारपट्टीवरील पर्यावरण तसेच तेथील जीवन यासाठी खूपच उपयुक्त असल्याचे सांगितले. किनारपट्टीवरील लोकांसाठी फक्त पर्यावरणाच्या दृष्टीनेच नाही तर आर्थिक जीवनमान उंचावण्यात खारफुटी वनस्पतींचा महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. किनारपट्टीची धूप आणि सुनामीसारख्या आपतींचे निराकरण करण्यासाठी खारफुटी वनस्पतीप्रजाती फारच उपयुक्त असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. व्याख्यानानंतर डॉ. चव्हाण यांनी उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सदर कार्यक्रमासाठी सुमारे १५० महाविद्यालयीन विद्यार्थी, महाराष्ट्र आणि इतर राज्यातील महाविद्यालयीन प्राध्यापक तसेच लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

डॉ. सोनाली कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. शरद आपटे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. तसेच प्रश्नोत्तर सत्राचे सूत्रसंचालन केले. विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा. ऋजुता गोडबोले आणि इतर सहकारी प्राध्यापकांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उत्तम सहकार्य लाभले.

Comments are closed.