gogate-college-autonomous-updated-logo

जागतिक वन दिनानिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि सामाजिक वनीकरण विभाग यांचा संयुक्त उपक्रम

प्रतिवर्षी दि. २१ मार्च रोजी ‘जागतिक वन दिन’ सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे संयुक्तरित्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रा. शरद आपटे यांच्या ‘कोकणातील वनस्पतींची विविधता’ या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कोकणातील वनसंपदा-सद्यस्थिती तसेच वनसंपदेचे आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या असलेले महत्व याविषयी भाष्य केले.

महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान, खानू येथे क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीचा लाभ घेतला. कोरोनाविषयक सर्व नियमावलीचे पालन करूनच ही क्षेत्रभेट संपन्न झाली. विभागातील प्रा. शरद आपटे यांनी उद्यानातील विविध वनस्पती आणि त्यांचे महत्व विषद केले. तसेच जागतिक वनदिन साजरा करण्यामागील भूमिका सांगितली. त्यांनी हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी वनांचे जतन आणि रक्षण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

सामाजिक वनीकरण विभागातील वनपाल श्री. सुभाष नाचणकर यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या परिसरातील झाडांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. तासेच शक्य असलेल्या ठिकाणी वृक्षारोपण करून आपले योगदान देण्याचे आवाहन केले. डॉ. सोनाली कदम यांनी आभार प्रदर्शन केले.

क्षेत्रभेटीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी विविध प्रकारची रोपे भेट देण्यात आली. जागतिक वन दिनाबरोबरच ‘जागतिक चिमणी दिन’ही साजरा करण्यात आला. सहभागी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभाग रोप वाटीकेस भेट दिली. या कार्यक्रमप्रसंगी वनपाल श्री. निलेश कुंभार तसेच सामाजिक वनीकरण विभागातील कर्मचारी श्री. दत्तात्रय यादव आणि श्री. वसंत झेपले उपस्थित होते.

जागतिक वानदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांच्या संयोजनात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, लागवड अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांचे सहकार्य लाभले.

Comments are closed.