gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जॉब फेअर २०१८ चे यशस्वी आयोजन

बजाज फिनसर्वने पहिली सीपीबीएफआय (सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन बँकिंग, फायनान्स अॅड इन्शुरन्स) ‘जॉब फेअर-२०१८’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने दि. १६ डिसेंबर २०१८ रोजी आयोजित केली होती. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण आणि देवरुख येथील १७८ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपला सक्रीय सहभाग नोंदवला. बँकिंग, फायनान्स, लाइफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स उद्योग क्षेत्रातील प्रामुख्याने बजाज फिनसर्वच्या उपकंपन्या उदा. बजाज फायनान्स, बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स आणि बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स यांनी उपस्थित विद्यार्थी उमेदवारांचे मूल्यमापन केले. एकूण ७३ विद्यार्थ्यांना नोकरीसाठी ऑफर मिळाल्या. सीपीबीएफआयच्या ४४ विद्यार्थ्यांपैकी २६ म्हणजे ५९% विद्यार्थ्यांची निवड झाली.

सीपीबीएफआय हा पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करणारा सर्वसमावेशक असा ४० दिवसांचा प्रोग्रॅम आहे. यातून विद्यार्थ्यांना बँकांची कार्ये, विमा व्यवस्थापन, संवाद कौशल्ये आणि संगणक कौशल्ये प्राप्त होण्यास मदत होते.

बजाज फिनसर्वचे श्री. अजय साठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सीपीबीएफआय या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाची सविस्तर माहिती दिली.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी याप्रसंगी आपले मनोगत विषद करताना सांगितले की, ‘महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांच्या करिअर डेव्हलपमेंट बरोबरच विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, आवश्यक गुण व कौशल्ये त्यांना उपलब्ध होतील हा आमचा प्रयत्न असतो, सीपीबीएफआय- जॉब फेअर-२०१८ हा उपक्रम म्हणजे महाविद्यालयाच्या ‘करिअर गाइडन्स अॅड प्लेसमेंट सेल’च्या निरंतर चालणाऱ्या उपक्रमांचाच एक भाग आहे.’

Comments are closed.