gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. प्र. ना. देशमुख स्मृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे प्रतिवर्षी माजी विभाग प्रमुख कै. प्र. ना. देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थविविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये पूर्वी हर्बल कॉस्मेटिक्स, ग्रीन एव्हेन्यूज अशा कार्यशाळांचे यापूर्वी आयोजन करण्यात आले होते.

विद्यमान वर्षी विभागातर्फे डॉ. मिलिंद सरदेसाई, वनस्पतीशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मिलिंद सरदेसाई यानी कीटकभक्षी वनस्पती या विषयावर मार्गदर्शन करत असताना जागतिक स्तरावर व भारतात आढळणाऱ्या कीटकभक्षी वनस्पती आणि त्यांच्यातील वैविध्य सांगितले. सदर कार्यक्रमास डीबीटी स्टार कोऑर्डीनेटर डॉ. विवेक भिडे,वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख श्री शरद आपटे, माजी विभाग प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन आणि प्राध्यापक जी. एस. कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्रीमती सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच श्रीमती गौरीनंदा सावंत, प्राचार्य, कौशल्य विकास केंद्र, रत्नागिरी या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षनिमित्त दि. ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेंटेशन, रील कॉम्पिटिशन आणि पाककला स्पर्धेच्या पारितोषिकांचे वितरण देखील करण्यात आले.

या स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून श्रीमती सुनंदा कुऱ्हाडे, श्रीमती सावंत, प्रा. जी एस. कुलकर्णी आणि डॉ. मंगल पटवर्धन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शरद आपटे व सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी केले.

Comments are closed.