गोगटे जोगळेकर महाविद्यालयात १९५७ साली सुरु झालेल्या कालिदास स्मृति समारोह व्याख्यान मालेचे ६०वे पुष्प प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ व दुर्ग अभ्यासक श्री. प्र. के. घाणेकर यांनी महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात गुंफले. ‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ आणि ‘शिवरायांचे दुर्गविज्ञान’ या दोन विषयांवरती त्यांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.
‘इतिहास घडवणाऱ्या वनस्पती’ या विषयावर बोलताना त्यांनी मसाल्याचे पदार्थ, बटाटा, रबर, नीळ यांसारख्या वनस्पती इतिहास घडवायला व बिघडवायला कारणीभूत कशा ठरल्या याचे विवेचन केले. मसाल्याचे पदार्थ निर्यात करताना मसाल्याच्या वनस्पती, रोगप्रतिकार क्षमतेमुळे बटाट्याचा प्रवास, नीळ वनस्पतीच्या उत्पादनामुळे ब्रीतीशांविरुद्दचे उठाव अशा अनेक वनस्पतींचा इतिहास घडवण्यामागील कार्य त्यांनी संगीतले. कोबाईबा, कोपईफेश आदि वानिस्पतींचे महत्व त्यांनी विषद केले.
‘शिवरायांचे दुर्गविज्ञान’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना महाराष्ट्रमध्ये जसे उत्कृष्ट व मजबूत किल्ले आढळतात तसे किल्ले पूर्ण जगामध्ये नाहीत असे अभ्यासपूर्ण विधान श्री. घाणेकर यांनी केले. किल्ल्यांचे आठ प्रकार सांगून प्रत्येक प्रकारातील किल्ल्यांचे महत्व विषद केले. म्हणूनच हे किल्ले दर्जेदार आहेत. सर्व किल्ले बांधत असताना शिवरायांनी वापरलेले स्थापत्यशास्त्र आणि दूरदृष्टी याचे विस्तृत विवेचनही केले.
यानंतर त्यांनी उपस्थित गिर्यारोहकांशी संवाद साधला. गिर्यारोहणाच्यावेळी येणाऱ्या अडचणी, आवश्यक अभ्यास, तयारी आणि नियोजन अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले.
व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी श्री. घाणेकर यांच्या व्याख्यानाचा आढावा घेऊन आपले किल्ल्यांचे अनुभव कथन केले. आणि प्रत्येकाने किल्ल्यांना शक्य असेल तेव्हा अभ्यासपूर्ण भेटी द्याव्यात असे आवाहन केले.
कार्याक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी केले. प्रारंभी संस्कृत विभागातील विद्यार्थ्यांनी नांदी सादर केली. नंतर कालिदास सामारारोहानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्या विद्यार्थांना मान्यवरांच्या गौरविण्यात आले. शांती मंत्र पठणाने या व्याख्यानमालेचा सापारोप झाला.