‘जागतिक कांदळवन दिना’च्या निमित्ताने गोगटे जोगळेकर महाविद्यालय आयोजित ‘कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रम’ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना कांदळवन सेल, रत्नागिरी चे फॉरेस्ट ऑफिसर श्री. राजेंद्र पाटील यांनी वरील भावना व्यक्त केल. ते पुढे म्हणाले की पर्यावरण संतुलनात कांदळवनाची भूमिका मोलाची व महत्त्वाची असल्याने वर्तमान स्थितीत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कांदळवन संरक्षण व जतन अपरिहार्य ठरले आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने आयोजित केलेला हा उपक्रम त्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरतो. याची पुढील काळात संरक्षण करणे ही जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पार पाडावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
सर्वत्र असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे अत्यंत छोटेखानी स्वरूपाच्या या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागाने केले होते. प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. मधुरा मुकादम यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी विभागातील प्रा. अंबादास रोडगे आणि विद्यार्थ्यांनी पार पाडली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनामुळे व संस्थेच्या पाठिंब्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाल्याची भावना संयोजकांनी व्यक्त केली.