गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे जागतिक खारफुटी दिनाचे औचित्य साधून दि. 23 जुलै 2024 रोजी क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. दि. 23 जुलै रोजी रनपार येथे विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना रनपार येथील खारफुटी परिसंस्था पाहणे व त्याच्या संवर्धनाची गरज समजून घेणे हा हेतू होता. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी रायझोफोरा म्युक्रोनाटा, रायझोफोरा अपेटला, लुमनित्झेरा, अविसेनिया, एजिसेरास, सेरियोप्स, अकॅथस, इ. खारफुटीच्या प्रजाती तसेच खारफुटीच्या सहयोगी वनस्पती यांचे निरीक्षण केले. तसेच तेथे असणाऱ्या खारफुटी वनस्पती त्यांचे त्या परिसंस्थेतील महत्त्व आणि खारफुटीच्या तोडीमुळे तेथे उद्भवणाऱ्या समस्या याबद्दल जाणून घेतले.
क्षेत्रभेटीदरम्यान डॉ विराज चाबके आणि प्रा. ऋजुता गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना खारफुटींच्या प्रजाती व तेथील प्राणी, पक्षी याबद्दल मार्गदर्शन केले. या क्षेत्रभेटीमध्ये द्वितीय आणि तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी तसेच प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे हे सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या आयोजनात वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.






Visitors Online : 3