गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील जानेवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर परीक्षा तीन जिल्ह्यांतील शाळांमधील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी खालीलप्रमाणे आहेत. (यादीतील पहिले नाव हे तालुक्यात प्रथम, दुसरे नाव तालुक्यातील द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळेसह नमूद करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थी विशेष गुणवत्ताधारक आहेत).
रायगड जिल्हा- मिणमिणे यशस्वी प्रफुल्ल (हळदवणेकर कन्याशाळा, अलिबाग); पाटील श्रीराज संतोष (चिंतामणराव केळकर विद्यालय, अलिबाग); कारेकर पियुष विष्णूप्रसाद (श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यामंदिर, माणगाव); गुंजाळ ऋतुजा सुरेश (श्री. वासुदेवानंद सरस्वती विद्यामंदिर, माणगाव); शेठ सेजल संजय (कै. पार्वती महादेव थरवळ कन्या विद्यालय, महाड); पानसरी अनिसा अझीम (उर्दू हायस्कूल, चांदवे बु., महाड); पानसरी मिबाह दाउद (उर्दू हायस्कूल, चांदवे बु., महाड); कामदे वैभव सुभाष (परांजपे विद्यामंदिर, महाड); मापकर मो.अझीम अ. करीम (एस.एस. निकम हायस्कूल, माणगाव); शेठ साहिल हरेश (एस.एस. निकम हायस्कूल, माणगाव); मोरे नियती राजू (न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा); शाह सबा सलीम (न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा); मुंढे वैष्णवी अनंत (केशवजी वीरजी कन्या विद्यालय, पनवेल); फडके समीक्षा पंढरीनाथ (केशवजी वीरजी कन्या विद्यालय, पनवेल).
रत्नागिरी जिल्हा- खोपडे राज शांताराम (एस.पी.एम. इंग्लिश मिडीयम स्कूल, चिपळूण); शिर्के सुरज संजय (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी, चिंचघरी); माळी शरयू विनायक ( एस.पी.एम. इंग्लिश स्कूल, पर्शुराम); मोडक आदित्य नारायण (न्यू इंग्लिश स्कूल, खेर्डी, चिंचघरी); कदम स्वप्नजा समीर (अलोरे हायस्कूल, अलोरे); करे प्रेरणा श्रीमंत (सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल, मार्कंडी);उबळेकर ऋतिका रमेश (अलोरे हायस्कूल, अलोरे); दातार यश हर्शल (ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली);पाटील अभिजित उत्तम (ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली); अभ्यंकर प्रणव पी. (ए. जी. हायस्कूल, दापोली);मोरे प्रथमेश मधुकर (ज्ञानदीप विद्यामंदिर, दापोली);सुतार गौरव दीपक (ए. के. केळकर हायस्कूल, वाडा); परब सार्थक संजय (आदर्श विद्यामंदिर, किंजवडे); दळवी चिन्मय दत्ताराम (करुणा सदन इंग्लिश मिडीयम स्कूल, साटेली); धारगळकर सागर संदीप (सरस्वती विद्यामंदिर, कुडासे);आठवले मिहीर मंदार (श्री. देव गोपालकृष्ण विद्यामंदिर, गुहागर);सटाळे प्रफुल्ल माधव (श्री. देव गोपालकृष्ण विद्यामंदिर, गुहागर);मोरे सुरज चन्द्रकांत (न्यू इंग्लिश स्कूल, आमडस); पाटील रोहीतकुमार तानाजी (न्यू इंग्लिश स्कूल, आमडस);मोरे तेजस मंगेश (न्यू इंग्लिश स्कूल, आमडस);काद्री मोहंमद सय्येद (हाजवानी इंग्लिश मिडीयम स्कूल, खेड); कदम सर्वेश राज (न्यू इंग्लिश स्कूल, आमडस);मोरे शिवानी संतोष (न्यू इंग्लिश स्कूल, आमडस); मोरे किरण उमेश (न्यू इंग्लिश स्कूल, आमडस);चव्हाण चिन्मयी रमाकांत (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा);कुवेस्कर आदिती विद्याधर (न्यू इंग्लिश स्कूल, लांजा);आडवीरकर मितेश दशरथ (नाटे विद्यामंदिर, नाटे);साळवी संपदा एस. (नाटे विद्यामंदिर, नाटे);ठाकूर प्रयाग अनिल (जी.जी.पी.एस., रत्नागिरी); अगीने पूर्व दीपक (जी.जी.पी.एस., रत्नागिरी);महाडिक सार्थक दीपक (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख);सोलकर मृण्मयी दल्लाराम (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख);शिंदे ऋषिकेश महेश (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख);रापशे ऋषिकेश अनिल (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख); शिरसाट शशांक चंद्रशेखर (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख);सूर्यवंशी माधुरी सुधाकर (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख); गिडे हर्षद अशोक (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख); तरळ चिन्मय विजय (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख);धाद प्रसाद रमेश (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख);भिंगार्डे ख़ुशी शिवाजी (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख);कोरे सुर्ष्टी संजय (न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख).
सिंधुदुर्ग जिल्हा- जयेश सुधीर पार्टे (भंडारी हायस्कूल, मालवण);सृष्टी सतीश वाघमारे (भंडारी हायस्कूल, मालवण);दळवी साहिल सुधीर (राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी);सावंत साईराज चन्द्रकांत (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी);सावंत तातोबा नंदकुमार (आरोंदा हायस्कूल, आरोंदा);परब अनिकेत आनंदराव (मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी);पावसकर सुफीयान मेहमूद (उर्दू हायस्कूल, श्रीवर्धन);कर्दमे अहमद मुसाद्दीक (उर्दू हायस्कूल, श्रीवर्धन);गावडे सर्वेश राजाराम (वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला);नाटेकर गायत्री विनीत (गुरु ए. व्ही. बावडेकर विद्यालय, शिरोडा);प्रभू मानस वल्लभानंद (माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी);सावंत अक्षता अरविंद (माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी).
कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचा शाळानिहाय निकाल आणि त्याबाबत तपशील सर्व शाळांना पोस्टाद्वारे पाठविण्यात आला आहे. ससेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या www.resgjcrtn.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. वरील सर्व विद्यार्थ्यांची अंतिम निवड परीक्षा रविवार दि. २५ फेब्रुवारी २०१८ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली आहे. गुणवत्ता यादीतील सर्व विद्यार्थ्यांनी या दिवशी सकाळी ९.०० वाजता उपस्थित राहावे. अंतिम निवड परीक्षेअंतर्गत सामान्य ज्ञान या विषयाची लेखी परीक्षा आणि विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीमद्धे विद्यार्थ्याचे अभ्यासातील प्राविण्य, व्यक्तिमत्वविशेष, छंद, इतर स्पर्धा परीक्षांतील सहभाग, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील नैपुण्य इ. बाबींचा विचार केला जाईल. अभ्यासानुवर्ती स्पर्धा अगर परीक्षांतील सहभाग तसेच मागील इयत्तामधील मिळविलेल्या प्राविण्याची प्रमाणपत्रे, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील नैपुण्याची प्रशस्तीपत्रे अथवा वृत्तपत्रातील कात्रणे अंतिम निवड परीक्षेकरिता येताना विद्यार्थ्यांनी सोबत आणणे अत्यंत अवश्यक आहे.
कात्रणे अंतिम निवड परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांमधून एक, विद्यार्थीनीमधून एक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून एक अशा तीन विद्यार्थ्यांची विशेष पारितोषिकांसाठी निवड केली जाणार आहे. परीक्षेच्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थी व पालकांकारिता सुमारे दोन तासांचा मार्गदर्शनपर चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अंतिम निवड परीक्षेचा कार्यक्रम अंदाजे सायंकाळी ३.३० वाजता पारितोषिक वितरण समारंभानंतर संपन्न होईल.
परीक्षेच्या निकालासंदर्भात अधिक माहितीकरिता या परीक्षेचे समन्वयक प्रा. दिलीप शिंगाडे (मोबाइल-८०८७८६१८१७) यांचेशी संपर्क साधावा. कोकण प्रज्ञा शोध परीक्षेमद्धे सुयश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कोकण प्रज्ञा शोध परीक्षेचे संचालक आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.