gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. बाबूराव जोशी जयंती समारोह संपन्न

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कै. बाबूराव जोशी यांचा जयंती समारोह नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार सुधीरजी गाडगीळ यांच्या शुभहस्ते, संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, उपाध्यक्ष श्री. बबनराव पटवर्धन, उपकार्याध्यक्ष अॅड. विजय साखळकर, सचिव श्री. सतीश शेवडे, सहसचिव श्री. नथुराम देवळेकर, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्ज्वलन संपन्न झाले. यावेळी जी.जी.पी.एस. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले.

प्रमुख अतिथी मा. आमदार सुधीरजी गाडगीळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ‘कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी यांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करून अशी माणसे पूर्वी होती म्हणून पदरचे पैसे घालून ही संस्था नावारूपाला आणली. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मातीला विसरू नका. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या विद्यार्थ्यांनी नाव कमावले व पदक मिळविले त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. खेळाविषयी आपली भूमिका व्यक्त केली.

कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी ‘कै. बाबुराव जोशी यांची १२१वी जयंती दिन म्हणून संकल्प दिनबाबत विचार व्यक्त केले. कै. बाबुराव जोशी यांनी संपूर्ण आयुष्य तन, मन, धन अर्पण करून संस्था नावारूपाला आणली. त्याला भक्कम पाठींबा कै. मालतीबाई जोशी यांनी कठीण प्रसंगी दिला. हे विचार मनात ठेऊन सर्व शिक्षकांनी कार्यक्षमपणे काम करून आपल्या संस्थेतील सर्व विद्यार्थी उत्तम गुण कसे प्राप्त करतील याचा विचार करावा.

उपाध्यक्ष श्री. बबनराव पटवर्धन यांनी ‘कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी यांचे आपल्या कुटुंबाशी असलेले नाते, बाबुरावांची सतत शिक्षणविषयक तळमळ आणि मालतीबाई यांची त्यांना मिळालेली भक्कम साथ यांचा उल्लेख केला.

प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी प्रमुख अतिथींची ओळख करून दिली. तसेच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा आवाका १५ घटक संस्था आणि १३००० विद्यार्थी असून संपूर्ण राज्यामध्ये नावारूपाला आलेली ही संस्था, याकरिता कै. बाबुराव जोशी व कै. मालतीबाई जोशी यांचे योगदान आणि त्यांनी घेतलेली मेहनत याविषयी सविस्तर आढावा घेतला.

सचिव श्री. सतीश शेवडे यांनी ‘आदर्श शिक्षक’ म्हणून श्री. किरण जोशी (जी.जी.पी.एस.) आणि ‘आदर्श शिक्षकेतर कर्मचारी’ म्हणून श्री. संदिप चव्हाण यांच्या नावांची घोषणा केली. दोघांनी आपल्या मनोगतामद्धे सर्वांचे आभार मानले.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी करणाऱ्या रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या घटक संस्थांमधील विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यामध्ये जयदीप परांजपे, आरती कांबळे, ऐश्वर्या सावंत, स्नेहा नेने (गोगटे जोगळेकर महाविद्यालय), पूर्वा किनरे, अपेक्षा सुतार, प्रणाली विलणकर (अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय), स्नेहल कनावजे, देवेंद्र खवळे (एन.सी.सी. गो. जो. महाविद्यालय), प्रीतिश दिक्षित (जी.जी.पी.एस.), वेदांत चव्हाण, सृष्टी जाधव, मार्तंड झोरे, प्राप्ती किनरे, प्राची सुफल (शिर्के प्रशाला).

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डी. आर. वालावलकर यांनी तर आभारप्रदर्शन श्री. नथुराम देवळेकर यांनी केले. सदर कार्यक्रमाला र. ए. सोसायटीच्या सर्व घटक संस्थांमधील शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Comments are closed.