gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कै. नारायण रघुनाथ गोगटे स्मृतिदिन साजरा

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे आद्य देणगीदार कै. नारायण रघुनाथ गोगटे यांचा दि. ७ जुलै हा स्मृतिदिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सामाजिक कार्याला दान करण्याची दातृत्ववृत्ती कै. नारायण रघुनाथ गोगटे यांचेकडे होती. त्यांनी १९४५ साली संस्थापकांकडे आपले वडील कै. र. प. गोगटे यांचे नाव देण्यात आलेले हे महाविद्यालय समाजात मानबिंदू ठरले आहे. कै. बाबुराव जोशी आणि कै. मालतीबाई जोशी यांच्या समाजोपयोगी कार्याला हातभार लावणाऱ्या कै. नारायण रघुनाथ गोगटे यांच्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना साम्बोधीतकरताना ही माहिती प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी दिली. तसेच ‘शिक्षक हा बहुआयामी असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगतीपथावर नेण्यासाठी आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पडावी’ असे आवाहन उपस्थितांना केले.

कार्यक्रमाची सांगता कै. गोगटे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले. याप्रसंगी कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, इतिहास विभागप्रमुख डॉ. आर. एच. कांबळे, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अशोक पाटील, कार्यक्रम समितीच्या प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. दिनेश माश्रणकर, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed.