गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातर्फे सायान्सिया कन्सल्टंटचे प्रमुख तंत्रज्ञ श्री. बी. एच. श्रीकांत यांचे व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. “प्रदूषण विरहित पर्यावरणासाठी हरित रसायनशास्त्र” या विषयावर त्यांनी पदव्युत्तर विद्यार्थांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे आणि पदव्युत्तर विभागाचे समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री. श्रीकांत यांनी रासायनिक कारखान्यातील प्रदूषण रोखण्यासाठी हरित रसायनशास्त्राचा वापर कशा पद्धतीने करता येईल याबाबत विस्तृत विवेचन केले. अपारंपरिक उर्जास्त्रोतातांचा वापर, हरित रसायनशास्त्र, योग्य कचरा व्यवस्थापन या मार्गाने आपण प्रदूषण विरहित पर्यावरणाची संकल्पना प्रत्यक्षात आणू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. नादिया दलवाई यांनी केले. यावेळी विज्ञान विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.