gogate-college-autonomous-updated-logo

मराठी विज्ञान परिषद द्वारा गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे “संशोधनाकडे वळा” विषयावर व्याख्याने संपन्न

मराठी विज्ञान परिषद द्वारा गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे संशोधनाकडे वळा विषयावर व्याख्याने संपन्न

मराठी विज्ञान परिषद मुंबई आणि रत्नागिरी विभाग द्वारा गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधनाकडे वळा’ ही व्याख्यानमाला दि. ०८ आणि ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये आयोजित केली होती. यामध्ये अनुक्रमे दि. ०८ फेब्रुवारी २०२३ रोजी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालय व रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी च्या विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . तर दि. ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी गंगाधर गोविंद पटवर्धन प्रशाला, रत्नागिरी,  गोदूताई जांभेकर प्रशाला, रत्नागिरी आणि फाटक प्रशाला, रत्नागिरी या शाळांतील विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व व्याख्यानांना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा, मुंबई या संस्थेतील पी.एच.डी. विद्यार्थी श्री. केतन देसाई हे व्याख्याते म्हणून लाभले होते.  व्याख्यानांच्या उद्घाटन प्रसंगी शाळांचे मुख्याध्यापक आणि मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभागाचे काम पाहणारे प्राध्यापक उपस्थित होते. दोन दिवस चालेल्या या व्याख्यानांमध्ये विद्यार्थ्यांनी संशोधानाकडे का आणि कसे वळावे याचे सोप्प्या आणि रंजक पद्धतीने व्याख्यात्यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व सहभागी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यानांचा लाभ घेतला. एकूण पाच व्याख्यानांदरम्यान साधारणपणे ७०० विद्यार्थी व १५ शिक्षक–अध्यापक उपस्थित होते. या व्याख्यानांच्या आयोजनासाठी मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक प्राध्यापक डॉ. उमेश संकपाळ यांनी विशेष प्रयत्न घेतले. त्यांना महाविद्यालयाच्या प्रा. सोनाली कदम, प्रा. वर्षा घड्याळे, प्रा. प्रतीक्षा बारसकर, प्रा. मोहिनी बामणे यांनी सहकार्य केले. महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी ही व्याख्याने यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचे आणि सहभागी व्यक्तींचे कौतुक केले.

 

Comments are closed.