भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘भारतीय संविधान आणि राज्यशास्त्रविषयक’ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कीर्ती महाविद्यालय, मुंबई येथील राज्यशास्त्र विभागाचे डॉ. हर्षद भोसले उपस्थित होते; त्यांच्या हस्ते सदर ग्रंथ प्रदर्शनाचे अनावरण करण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यावेळी उपस्थित होते. सदर प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी महाविद्यालयीन ग्रंथालयात आयोजित केले जाणारे सर्व उपक्रम हे विद्यार्थीकेंद्रित असून त्यांचे सत्यत्याने आयोजन केले जाते. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांच्या नेहमी मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. भोसले यांनी भारतीय संविधानाचे महत्व विषद केले. आजच्या दिवशी सर्वांनी संविधानाची विस्तृत माहिती घेऊन आपले अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव जागृत करावी असे आवाहन केले. तसेच एक स्तुत्य उपक्रम म्हणून ग्रंथ प्रदर्शनाच्या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. आभारप्रदर्शन श्री. उत्पल वाकडे यांनी केले.