गोगटे जोगळेकर महाविद्यालयात दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, प्रमुख वक्ते डॉ. सदानंद आग्रे, कार्यक्रम समिती समन्वयक डॉ. तुळशीदास रोकडे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
गणित विभागातर्फे शिवम राजन कीर यास कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक तसेच प्रथम वर्ष विज्ञान शाखेत गणित विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल गौरविण्यात आले . तसेच मुस्कान बोहर चिकाटे हिस कै. प्रभाकर करमरकर गणित पारितोषिक आणि द्वितीय वर्ष विज्ञान शाखेत गणित विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल पारितोषिक देण्यात आले. स्मितल मधुसुधन बैठे, गौरांग माधव नामजोशी यांस लोकमान्य टिळक पारितोषिक इ. १२वी मध्ये संस्कृत विषयात उत्तम गुण संपादन केल्याबद्दल पारितोषिक देण्यात आले.
मराठी विभाग पुरस्कृत गणेशशास्त्री घाटे पारितोषिक आणि द्वितीय वर्ष कला शाखेत मराठी विषयात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल श्रेयस राजेश पाटील यास गौरविण्यात आले.
पूर्वा कु. शशिकांत कदम हिला महाविद्यालयाकडून सर्वगुणसंपन्न, हुशार, अभ्यास आणि अभ्यासेतर उपक्रमात अग्रेसर असणाऱ्या विद्यार्थी वा विद्यार्थिनीला दिला जाणारा ‘कै. उन्मेष घाटे आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ देण्यात आला.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरी आयोजित, लोकमान्य टिळक पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक: कु. मनस्वी मुकुंदराव नाटेकर, द्वितीय क्रमांक कु. कल्पजा प्रभाकर जोगळेकर, तृतीय क्रमांक कु. ओंकार मंदार आठवले, उत्तेजनार्थ कु. रिझा लाईक हरचिरकर यांना पुरस्कार देण्यात आला.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील यश प्राप्त केलेले विद्यार्थी- प्रथम क्रमांक कु. स्वरा शैलेश पाटणकर, द्वितीय क्रमांक कु. तीर्था संदीप मांजरेकर, तृतीय क्रमांक कु. आदिती मिलिंद जोशी, उत्तेजनार्थ कु. शर्वरी किरण आडिवरेकर यांना पुरस्कार देण्यात आला.
लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त आयोजित निबंध स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयातील पुढील विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले प्रथम क्रमांक कु. स्वरा अरुण मुळे, द्वितीय क्रमांक कु. ऐश्वर्या सचिन सावंत, तृतीय क्रमांक कु. स्वरा शैलेश पाटणकर, उत्तेजनार्थ कु. अदिती मिलिंद जोशी यांना देण्यात आला.
प्रमुख वक्त्यांचा सत्कार प्राचार्यांचे हस्ते करण्यात आला. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. मेघना म्हादये यांनी करून दिला. प्रमुख वक्ते डॉ. सदानंद आग्रे यांनी ‘लोकमान्य टिळक दर्शन’ या विषयावर व्याख्यान देत असताना लोकमान्य टिळकांच्या आयुष्यात घडलेले अनेक प्रसंग, टिळक आणि संत तुकाराम यांच्या जीवनातील साधर्म्य, टिळक आणि गांधीजी यांच्या जीवनातील प्रसंग यावर भाष्य केले. विद्यार्थ्यांनी टिळकांमध्ये असलेला बाणेदारपणा, निर्भिड वृत्ती, स्थितप्रज्ञता या गुणांबद्दल माहिती होण्यासाठी टिळकांच्या साहित्याचे वाचन, चिंतन आणि केले पाहिजे असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना टिळकांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान याबद्दल सांगितले.
वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विभागप्रमुख आणि शिक्षक या कार्यक्रमास उपस्थित होते. वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.