गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये कला शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील आणि मुंबई विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एक प्रतिथयश आणि नामवंत महाविद्यालय आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून महाविद्यालयात कला, विज्ञान आणि वाणिज्य या पारंपरिक अभ्यासक्रमांतील पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबरच विविध व्यावसायिक अभ्यासक्रम देखील चालविले जातात.
महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक पदव्युत्तर केंद्राच्या माध्यमातून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जातात. कला शाखेमध्ये मध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषा आणि इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र या सामाजिक शास्त्रांमधून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेण्याची सोय उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून मानसशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असून, त्या माध्यमातून विद्यार्थांना भविष्यात नोकरी-व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात.
मुंबई विद्यापीठाच्या नियम आणि मार्गदर्शनपर सूचनेनुसार इतर ज्ञान शाखा अथवा विषयांमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कला शाखेतील एम.ए. या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेशपरीक्षा देणे आवश्यक आहे. परीक्षेत पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये एम. ए. पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अन्य शाखा आणि विषयातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दु. ०१.०० या वेळेत महाविद्यालयात संबंधित विभागात करण्यात आले आहे.
शिक्षण, संशोधन, स्पर्धा परीक्षा अशा विविध क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे साहाय्य महाविद्यालयामार्फत केले जाते.
सदर विषयांच्या एम.ए. अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अन्य माहितीसाठी संबंधित विभागप्रमुखांशी अथवा कला शाखा उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये आणि प्रा. सचिन सनगरे (मोबा. ८६६८८६०१०३) यांच्याशी सकाळी ९.०० ते १.०० या वेळेत संपर्क साधावा. तसेच या संदर्भात अधिक माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रदर्शित केली जाणार असून, विद्यार्थी, पालकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी.
महाविद्यालयाला प्राप्त झालेला स्वायत्ततेचा दर्जा आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून सुरु करण्यात येणारे नवनवीन विषय आणि अभ्यासक्रमांचा लाभ कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.





Visitors Online : 1