gogate-college-autonomous-updated-logo

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा २०२१ चा आदर्श कीर्तनकार पुरस्कार गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या ह.भ.प. श्री. महेश सरदेसाई यांना

mahesh-sardesai-kirtan-puraskar-2022

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात कार्यरत असलेले श्री. महेश सरदेसाई यांना कऱ्हाडे ब्राह्मण संघाचा २०२१ चा ‘आदर्श कीर्तनकार’ पुरस्कार नुकताच समारंभपूर्व देण्यात आला. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक या राज्यांत त्यांनी २७ वर्षे आपली कीर्तन सेवा केली आहे. त्यांची आजवर सुमारे दोन हजार कीर्तने झाली आहेत. कऱ्हाडकर पठडीचे ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. श्री. दत्तदासबुवा घाग, ह.भ.प. श्री. गंगाधरबुवा व्यास व ह.भ.प. श्री. श्रीपादबुवा ढोले यांचे मार्गदर्शन ते आजवर घेत आले आहेत.

रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या सन २०२१ सालच्या विविध पुरस्कारांचे वितरण रविवारी सायंकाळी संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात ब्राह्मण हितवर्धिनी पतसंस्थेचे संस्थापक, ब्राह्मण हितवर्धिनी सभेचे अध्यक्ष श्री. उदय गोविलकर यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. माधव हिर्लेकर, माजी अध्यक्ष श्री. चंद्रकांत हळबे, ठाणे कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह श्री. संदीप कळके उपस्थित होते.

याप्रसंगी उदय गोविलकर म्हणाले की, समाजातील चांगल्या कामाची दखल घेऊन आणि कोणतेही अर्ज, फाईल न मागता रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ पुरस्कार देत आहे. ही एक उत्कृष्ट परंपरा संघाने निर्माण केली आहे. आज ज्यांचा सत्कार झाला ते गुणी आहेत. यामुळे सत्काराची उंची वाढली, ज्या नावाचा सत्कार घेतो, त्याचा सन्मान यानिमित्ताने झाला आहे. समाजात गुणीजनांमध्ये वाढ होण्यासाठी हे पुरस्कार महत्त्वाचे आहेत. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, पुस्तक भेट आणि श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्काराबद्दल गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी श्री. सरदेसाई यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments are closed.