gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ ग्रंथ प्रदर्शनाने साजरा

कै बाबुराव जोशी ग्रंथालय मराठी भाषा दिवस ग्रंथ प्रदर्शन

गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज यांचा दि. २७ फेब्रुवारी हा जन्मदिन साजरा करण्यात आला. मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि विविध मराठी बोलींवर आधारित ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालयाच्या भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा येथे आयोजित करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कवी श्री. अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, ज्येष्ठ रंगकर्मी आणि समाजसेवक श्री. सुनील कोळपे, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवराज गोपाळे, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. प्रीती टिकेकर, सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, श्री. सचिन पेडणेकर उपस्थित होते. वाचक गटाची विद्यार्थिनी कु. जान्हवी जोशी हिने उपस्थितांचे स्वागत केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कु. जान्हवी हिने मराठी भाषा आणि कविवर्य कुसुमाग्रज यांचेविषयी सविस्तर माहिती दिली. भाषा आणि साहित्य यांचे मानवी जीवनातील महत्व तिने विषद केले. प्रमुख पाहुण्यांनी ग्रंथालयाच्या ग्रंथ प्रदर्शन उपक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ओंकार आठवले याने केले. सदर ग्रंथ प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.