रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालय, रत्नागिरी मध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ‘विज्ञानातील महिला : विकसित भारत घडविण्यात प्रेरक शक्ती’ या संकल्पनेवर आधारित ‘जीजेसी सायन्स-फेस्ट २०२६’ अंतर्गत हे प्रदर्शन दि. २७ फेब्रुवारी २०२६ सोजी सकाळी १०.०० ते दुपारी ०३.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. सदर विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे.
या निमित्ताने शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व विज्ञान प्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प, विभागीय प्रदर्शने, प्रयोगशाळा भेटी, विज्ञान उद्योजकांचे स्टॉल्स आणि विज्ञानानावर आधारित विविध खेळ यांचा समावेश असणार आहे. प्रत्यक्ष उद्योग, आकर्षक मॉडेल्स आणि नवकल्पनांच्या माध्यमातून विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा या विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश आहे.
विद्यार्थी, शिक्षक तसेच सर्व विज्ञानप्रेमींनी या विज्ञान मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा; असे आवाहन विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
|
|






Visitors Online : 0