gogate-college-autonomous-updated-logo

मराठी विज्ञान परिषद द्वारा गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे ‘संशोधनाकडे वळा’ विषयावर व्याख्याने संपन्न

मराठी विज्ञान परिषद द्वारा गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे ‘संशोधनाकडे वळा’ विषयावर व्याख्याने संपन्न

मराठी विज्ञान परिषद मुंबई आणि रत्नागिरी विभाग द्वारा गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधनाकडे वळा’ ही व्याख्यानमाला दि. ११, १२ आणि १३ डिसेंबर २०२३ रोजी विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये आयोजित केली होती. यामध्ये अनुक्रमे दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालयाच्या इ. १२ वी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . तर दि. १२ डिसेंबर रोजी अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ट महाविद्यालयाच्या इ. ११ वी आणि जागुष्ट्ये प्रशाला, कुवारबांव, रत्नागिरी तसेच अ. के. देसाई प्रशाला, रत्नागिरी या विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर दि. १३ डिसेंबर रोजी देव-घैसास-कीर महाविद्यालय, रत्नागिरी या विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

या सर्व व्याख्यानांना इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा, मुंबई या संस्थेतील पी.एच.डी. विद्यार्थीनी श्रीम. अनुप्रिता अरुण मठकर व्याख्यात्या म्हणून लाभल्या होत्या. व्याख्यानांच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालाचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक आणि मराठी विज्ञान परिषद, रत्नागिरी विभागाचे काम पाहणारे प्राध्यापक उपस्थित होते.

तीन दिवस चालेल्या या व्याख्यानांमध्ये विद्यार्थ्यांनी संशोधानाकडे का आणि कसे वळावे याचे सोप्प्या आणि रंजक पद्धतीने व्याख्यात्यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व सहभागी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यानांचा लाभ घेतला. सहा व्याख्यानांदरम्यान साधारणपणे ८०० विद्यार्थी व २० शिक्षक-अध्यापक उपस्थित होते. या व्याख्यानांच्या आयोजनासाठी मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. उमेश संकपाळ यांनी विशेष प्रयत्न घेतले. त्यांना महाविद्यालयाच्या डॉ. मिलिंद गोरे, डॉ. मधुरा मुकादम, प्रा. समिधा शिंदे,प्रा. मोहिनी बामणे, प्रा. श्रद्धा सुर्वे यांनी सहकार्य केले.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी ही व्याख्याने यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचे आणि सहभागी व्यक्तींचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानांचे आयोजन विद्यार्थ्यांकरिता व्याख्यानांचे आयोजन
Comments are closed.