मराठी विज्ञान परिषदेतर्फेविद्यार्थी गटासाठी “मोबाईलपासून मैदानाकडे” तर खुल्या गटासाठी “देहदान आणि अवयवदान” या विषयावर राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. सदर स्पर्धेमध्ये मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर व ठाणे येथून विद्यार्थी गटात एकूण २१२ व खुल्या गटातून १३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थी गटाकरिता श्री. महेश मुळ्ये, जी. जी. पी. एस. विद्यालय, रत्नागिरी व सौ. मेधासहस्त्रबुद्धे, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी तसेच खुल्यागटाकरिता डॉ. दिनेश माश्रणकर व डॉ. विराज चाबके, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.
विद्यार्थी गटात सीमा संतोष भुवड (मु. पो. आंबवली, ता. दापोली, जि.रत्नागिरी) व सफा वसीम कालसेकर (मु. पो. पाचल, ता. राजापूर, जि. रत्नागिरी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच खुल्या गटातूनप्रगती वैभव भगत (पेण- रायगड) आणि श्री. स्वप्निल सुधाकर झगडे (खारघर, नवी मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. विजेते स्पर्धक यांना विभागाकडून मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांचेकडून प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात येईल. सदर स्पर्धेचे समन्वयकम्हणून डॉ. उमेश संकपाळ यांनी काम पाहिले.
सर्व विजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.






Visitors Online : 0