gogate-college-autonomous-updated-logo

गणित विभागाची “पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन” स्पर्धा संपन्न

     गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांकरीता दि. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी “पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन” ह्या विषयावरील स्पर्धेचे आयोजन केले गेले. ह्याप्रसंगी व्यासपीठावर परीक्षा नियंत्रण प्रमुख  डॉ. विवेक भिडे, गणित विभाग प्रमुख डॉ. दिवाकर करवंजे, स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक प्रा. प्रीती भिडे व सौ. विदुला भोसले उपस्थित होते.सध्याच्या डिजीटल शिक्षणपद्धतीत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन हे अत्यंत महत्वाचे साधन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यानी संपूर्ण तयारीने, मांडत असलेल्या विषयाचा सखोल अभ्यास करून अशा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे असे मनोगत उद्घाटनप्रसंगी परीक्षानियंत्रण प्रमुख डॉ. विवेक भिडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत गणित विभाग प्रमुख      डॉ. दिवाकर करवंजे यांनी केले. विद्यार्थ्यांना पॉवरपॉईंटचे स्किल्स, स्टेजवरील वावरासाठी आत्मविश्वास मिळणे, संभाषण कौशल्ये येणे ह्या हेतूने ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते.ह्या स्पर्धचे परीक्षण दोन व्यक्तीकडून केले जाते यामध्ये एक व्यक्ती गणित विषयातील तज्ञ तर दुसरी व्यक्ती कंप्यूटर सायन्स या विषयात प्रवीण असते.

      स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेल्या सौ. विदुला भोसले यांनी सहभागी विद्यार्थ्याना प्रेझेंटेशन तयार करताना कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत तसेच विद्यार्थ्याना आत्मविश्वासाने सर्वांसमोर सादरीकरण करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. प्रीती भिडे यांनी सादरीकरण करताना वेग कसा असावा, गणिताच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असाव्यात असेही मत व्यक्त केले.

ह्या स्पर्धेमध्ये एकूण १८ संघ मिळून ३३ विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. त्यातील कु. शिवम कीर, कु निशात पावसकर व कु. बुशरा सुवर्णदुर्गकर, कु. श्रेया पातकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय वतृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.

      आपला विषय चांगल्या पद्धतीने मांडणे, आत्मविश्वासाने समोर येऊन बोलणे याचे शिक्षण महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमुळे मिळणे शक्य आहे असे मत विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या  डॉ. ए. एम. कुलकर्णी यांनी समारोपाच्या कार्यक्रमात व्यक्त केले तसेच गणित विभागाद्वारे गेली १५ वर्षे सातत्याने ही स्पर्धा घेण्यात येत असल्याने याबद्दल गणित विभागाचे आणि सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा सुर्वे यांनी केले. सरतेशेवटी स्पर्धा समन्वयक प्रा. स्पृहा जोशी यांनी विज्ञान उपप्राचार्या, परीक्षक, गणित विभागप्रमुख व महाविद्यालयाचे आभार मानले. महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहभागी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा उत्तमरीत्या पार पडली. 

 

Collage Program
Comments are closed.