gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘मेरा माटी, मेरा देश’ अभियान – विविध उपक्रम संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘मेरा माटी, मेरा देश’ अभियान - विविध उपक्रम संपन्न

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात ‘मेरा माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचे औचित्य साधून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘मेरा माटी मेरा देश’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेमआणि साक्षरता निर्माण व्हावी, वीर योद्ध्यांच्या समर्पणाचे स्मरण करण्याच्या हेतूने संपूर्ण भारतभर हे अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार गोगटे जोगळेकर महाविद्यालयातही दि. ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘मेरा माटी मेरा देश’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाविद्यालयात कला शाखेच्या वतीने दि. ११ ऑगस्ट रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील सामाजिकशास्त्र विभागाच्यावतीने प्राचीन भारतीय इतिहास, वास्तुकला वशिल्पकला, शेती, आर्थिक प्रश्न, भूगोल, ग्रामीण विकास, मतदार जनजागृती यासंबंधी तर भाषा विभागाच्या वतीने ओडीसी नृत्य, भरतनाट्यम, देशाचास्वातंत्र्यलढा, क्रांतिकारक, देशभक्त, हिंदी साहित्यिक या विषयावरील कविता आणि भित्तीपत्रक प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. अतुल पित्रे, डॉ. शाहू मधाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याचवेळी ‘Journey of India’ आणि ‘Physical and Cultural India’ या विषयावरील भारताच्या प्रगतीच्या आलेख मांडणाऱ्या लघुचित्रफिती विद्यार्थ्यांना दाखविण्यात आल्या. विद्यार्थांनी चांद्रयान मोहिम ही थीम घेऊन काढलेली रांगोळी या प्रदर्शनाची मुख्य आकर्षण ठरली.

महाविद्यालयातील फिल्म क्लबच्यावतीने डॉ. ज. शं. केळकर सभागृहात एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्याप्रारंभी डॉ. निधी पटवर्धन यांनी विद्यार्थांना या अभियानासंदर्भातील पंचप्राण शपथ दिली. उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी या उपक्रमाचे आयोजन करण्यामागील हेतू, उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देऊन उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यानंतरविद्यार्थांनीदेशभक्तीपर स्वरचित कविता, गीतांचेसादरीकरण केले. गीतआणि कविता सादरीकरणानंतर जुन्या-नव्या गाण्यांचा संगम असलेल्या आणिभारत देशाची महती सांगणाऱ्या राष्ट्रभक्तीपर गीतांचे स्क्रीनिंग करण्यात आले. तसेचराष्ट्रीयएकात्मता, सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता यांचा संदेश देणारी ‘लड्डू’ ही लघुचित्रफितविद्यार्थांना दाखविण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी र. ए. संस्था, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन तर कलाशाखेच्या उपप्राचार्या डॉ.चित्रा गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली डॉ. निधी पटवर्धन, डॉ. रामा सरतापे, प्रा. प्रणाली मांजरेकर, प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. मधुरा चव्हाण, प्रा. कृष्णात खांडेकर, प्रा. निलेश पाटील, प्रा. विनायक गावडे आणि फिल्म क्लबचेसदस्ययांनी परिश्रम घेतले. याप्रदर्शनास विज्ञान, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. यास्मिन आवटे, विविध विभागप्रमुख, विद्यार्थी यांनी भेट दिली. या अभियानाअंतर्गत पार पडलेल्या सर्व कार्यक्रमात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, विद्यार्थी उस्फुर्त सहभागी झाले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘मेरा माटी, मेरा देश’ अभियान - विविध उपक्रम संपन्न

Comments are closed.