स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ (Meri Maati Mera Desh) अर्थात ‘माझी माती माझा देश’ (Majhi Mati Maja Desh) अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पंच प्रण शपथ घेऊन वरत्नागिरी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे यांच्या हस्ते वृक्षरोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
महाविद्यालयस्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्र भक्तीपर कविता वाचन, भित्तीपत्रक, वीरांचे वंदन, चित्रफित प्रदर्शन अशा विविध उपक्रमचे संयोजन विभाग व महाविद्यालयामार्फत केले जाणार आहे.
या उपक्रम आरंभी रत्नागिरी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी डॉ. दानिश गनी, प्रा. सचिन सनगरे, प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक बहुसंख्येने उपस्थित होते.






Visitors Online : 6