स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम देशभर संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ‘मेरी माटी, मेरा देश’ या नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. या उपक्रमान्तर्गत्त गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी मध्ये सर्व शैक्षणिक विभाग आणि इतर अभ्यासेतर उपक्रम विभागामार्फत पंचप्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरोंका वंदन, ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत असे कार्यक्रम राबण्याचे ठरवले आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार दि. ०९ ऑंगस्ट २०२३ रोजी स. १० वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपली मातृभूमी, आपला देश याबद्दल बांधिलकी निर्माण व्हावी म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी राधाबाई शेट्ये सभागृहात र. ए.सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे यांच्या प्रमुख उपस्थित विध्यार्थ्याना शपथ देऊन ‘मेरी माटी, मेरादेश’ या उपक्रमाचा शुभारंभ केला.
त्यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मान. शिल्पाताई पटवर्धन आणि श्री. सतीशजी शेवडे, प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे उप-प्राचार्य तसेच प्राध्यापक वृंद उपस्थित होते.