gogate-college-autonomous-updated-logo

उद्योजकता वाढीसाठी ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिनर्स संस्थेचा गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीशी सामंजस्य करार

ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिनर्स संस्थेचा गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीशी सामंजस्य करार

आधुनिक युगामध्ये जागतिक रोजगार निर्मितीसाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य प्राप्त करण्यासाठी ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिनर्स’ या संस्थेशी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने सामंजस्य करार केला आहे. याप्रसंगी ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिनर्स’ या संस्थेचे संस्थापक सीए श्री. सिद्धार्थ सिनकर आणि त्यांच्या पत्नी सौ. सीमा सिनकर या उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीसाठी ही संस्था तीन स्तरावरती काम करणार आहे. हुशार आणि होतकरू मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी ‘सुभद्राबाई शिक्षण निधी संस्था’ काम करणार आहे. तसेच उद्योजकता वाढीसाठी मोटिवेशनल लेक्चर्स, नवीन उद्योजक, विद्यार्थ्यांसाठी आर्थिक संधी कोणत्या प्रकारच्या आहेत याविषयी संस्थेतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याचबरोबर विक्री व्यवस्थेसाठी ‘ग्लोबल चेंबर ऑफ सारस्वत एंटरप्रिनर्स’ ही संस्था सहकार्य करणार आहे. सदर करारामुळे गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि रत्नागिरीतील स्थानिक युवकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.

सीए श्री. सिद्धार्थ सिनकर यांचा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत व्यवसाय सुरू असतो. तसेच ते सामाजिक बांधिलकी म्हणून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. सदर सामंजस्य करारप्रसंगी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी सहकार्य करायचे मान्य केले आहे. तिन्ही शाखांचे उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. सीमा कदम, डॉ. चित्रा गोस्वामी, IQAC समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूर देसाई, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. विवेक भिडे, डॉ. रुपेश सावंत, डॉ. आनंद आंबेकर उपस्थित होते.

‘उद्योग आणि आर्थिक संधी केवळ महाविद्यालयाशी मर्यादित न राहता रत्नागिरी शहरातील उद्योजकांसाठीही त्यांचा उपयोग व्हावा’ अशी इच्छा प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर आणि सीए श्री. सिद्धार्थ सिनकर यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.