gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि बी. के. एल. वालावलकर मेडिकल महाविद्यालय यांच्यामध्ये सामंजस्य करार संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि वालावलकर मेडिकल महाविद्यालय यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील एक नामवंत महाविद्यालय असून नॅक मूल्यांकनात महाविद्यालयाने सलग चार मुल्यांकनामध्ये ‘अ’ श्रेणी प्राप्त केली आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य आणि संशोधन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय सुयश प्राप्त केलेले आहे. महाविद्यालयाने महाराष्ट्रातील तसेच देशातील विविध आस्थापनांबरोबर सामंजस्य करार केले असून या माध्यमांतून विविध सामंजस्य आणि समाजाभिमुख विविध शिक्षणिक, सहशैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच धर्तीवर महाविद्यालयाने लोकोपयोगी संशोधनास चालना मिळावी म्हणून बी. के. एल. वालावलकर मेडिकल महाविद्यालय जे महाराष्ट्र युनिवर्सिटी हेल्थ सायन्स यांच्याशी संलग्न आहे, याच्याशी सामंजस्य करार संपन्न केला आहे.

या सामंजस्य करारांतर्गत फॅकल्टी- स्टूडेंट एक्स्चेंज, स्टूडेंट इंटर्नशिप, संशाधन सहकार्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन दोन्ही आस्थापनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यास आणि रोगसुचक सामग्री स्वस्त आणि सुलभ बनविण्यासाठी लागणाऱ्या संशोधनावर प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारासाठी वालावलकर मेडिकल महाविद्यालायातर्फे संचालक डॉ. सुवर्णा पाटील, टाटा मेमोरिअल सेंटरशी संलग्न वरिष्ठ संशोधक डॉ. रिटा मुल्हेकर, डॉ. नेताजी पाटील, डॉ. रोहित भट, डॉ. अनुप निलावार उपस्थित होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. चित्रा गोस्वामी, विविध विभागांचे विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. हा सामंजस्य करार प्रत्यक्षात येण्यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि डॉ. विवेक भिडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Comments are closed.