गोगटे जोगळेकर महाविद्यालयात एम.एस्सी. भाग-१ करिता प्रवेश प्रीक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ वेबसाईटवर उपलब्ध ग्रेड कार्डाची झेरॉक्सप्रत, शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत, तीन रंगीत फोटो प्रवेश अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मुंबई विद्यापीठाव्यतिरिक्त इतर विद्यापीठातील विद्यर्थ्यांनी इ. १०वी पासूनची सर्व मूळ गुणपत्रके आणणे आवश्यक आहे. प्रवेश अर्जावर पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. पी. पी. कुलकर्णी (रसायनशास्त्र विभाग) यांची सही घेणे आवश्यक आहे. यानंतर सदर प्रवेश अर्ज कार्यालयात श्री. भारती यांच्याकडे विषयाप्रमाणे पूर्ण फी भरून जमा करावा.
महाविद्यालयात एम.एस्सी. भाग-१ या वर्गासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र (अॅनालॅटिकल व ऑरगॅनिक), बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, गणित, संगणकशास्त्र या विषयांना प्रवेश देण्यात येतो. प्रवेश अर्ज कार्यालयीन वेळेत महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
वरील विषयांसाठी विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा तसेच अधिक माहितीसाठी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार् डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.