गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला खो-खो स्पर्धा २०१८ चे उदघाटन महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी योजक असोसिएट्सचे उद्योजक श्री. कृष्णा तथा नानासाहेब भिडे, मुंबई विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. उत्तम केंद्रे, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन सरचिटणीस श्री. संदीपजी तावडे, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना क्रीडा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, क्रीडा मार्गदर्शक सहसचीव महाराष्ट्र राज्य छत्रपती पुरस्कार विजेते ऍड. अरुण देशमुख, महाराष्ट्र राज्य सल्लागार समिती सदस्य श्री. कमलाकर कोळी, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी समिती सदस्य व माजी विद्यार्थी श्री. राजेश कळंबटे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धांकरिता प्रायोजक म्हणून माजी नगराध्यक्ष श्री. उमेशजी शेट्ये, श्री. मुसद्दीक मुकादम, श्री. निखील देसाई, श्री. रऊफ हवालदार, श्री. हृषीकेश पटवर्धन, श्री. बाबा दळी यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खो-खो खेळाडू कु. ऐश्वर्या सावंत, खेलो इंडिया करीता निवड झालेली कु. अपेक्षा सुतार, कु. गौरी पवार व महाराष्ट्र राज्याची कर्णधार कु. आरती कांबळे याचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेकरिता मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयीन १६ संघ उपस्थित आहेत. उदघाटनाचा सामना कीर्ती कॉलेज आणि जोशी-बेडेकर कॉलेज यांच्यात झाला. मान्यवरांनी उपस्थित खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.