gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील नौदल एन.सी.सी. छात्र स्वानंद पाटील याला राष्ट्रीय सन्मान

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील नौदल एन.सी.सी. छात्र स्वानंद पाटील याला राष्ट्रीय सन्मान

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील नौदल एन.सी.सी. विभागात २०२०-२१ या वर्षी तृतीय वर्षात असणारा, तसेच तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील प्राणीशास्त्र विभागात अध्ययन करणारा एन.सी.सी छात्र सिनियर कॅडेट कॅप्टन स्वानंद प्रसाद पाटील याला D.G.N.C.C. NEW DELHI यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावरील D.G. N.C.C. COMMENDATION CARD हा एन.सी.सी छात्रांसाठीचा राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार त्याच्या एन.सी.सी मधील योगदानाबद्दल २०२१ या वर्षासाठी मिळाला.

स्वानंद पाटील यांनी २०१८ या वर्षी नौदल एन.सी.सी. मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला. त्याने आपला मनमिळावू स्वभाव, सहकार्य वृत्ती, कार्यकुशलता या गुणांच्या आधारे एन.सी.सी मधील तृतीय वर्षामध्ये सिनियर कॅडेट कॅप्टन ही छात्रांसाठीची सर्वोच्च प्रमोशन रँक मिळवली. नौदल एन.सी.सी विभागात कार्य करताना या छात्राने Combine Annual Training Camp-2018, IGC- Nausainik Camp-2019, Nausainik Camp- I,II,III,-2019, Pre-Menu Camp-2021, Menu Camp-2021, Cadre Camp for ‘C’ Certificate Exam-2021 यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्याने पुणे येथील IGC-NSC कॅम्पमध्येबोट पुलिंग इव्हेंट मध्ये रजत पदक, ड्रिल मध्ये रजत पदक, बोट रिगिंग इव्हेंट मध्ये सुवर्ण पदक, मेनू कॅम्प मध्ये रजत पदक, ‘बी’ सर्टिफिकेट परीक्षेमध्ये‘A(AAA)’ GRADE मिळवली. त्याचप्रमाणे २ महाराष्ट्र नेव्हल एन.सी.सी युनिट कडून आलेल्या सूचनेनुसार व विभागामार्फत आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमात त्याने सक्रीय सहभाग घेतला. त्याच्या या तीन वर्षातील कार्याचीनोंदनेव्हल एन.सी.सी युनिटचे प्रमुख कमांडर एम.एम सईद यांनी घेऊन या छात्राच्या नावाची शिफारस वरील पुरस्कारासाठी केली होती.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी DG NCC तर्फे एन.सी.सी डे चे औचित्य साधून वरील पुरस्कार देशभरातील आर्मी-नेव्ही-वायुदल एन.सी.सी मधील निवडक ६२ छात्रांना जाहीर करण्यात आला.

स्वानंद पाटील यांनी मिळवलेल्या या सन्मानाबद्दल त्याचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मान. श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, सचिव मान. श्री. सतिश शेवडे व इतर पदाधिकारी, गोगटे महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, कमांडिंग ऑफिसर कमांडर एम.एम. सईद तसेच महाविद्यालाचे सर्व माजी एन.सी.सी. विद्यार्थी यांनी कौतुक आणि अभिनंदन केले.

Comments are closed.