gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिन संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिन संपन्न

राष्ट्रीय विज्ञान दिन हा महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या ‘रमण इफेक्ट’बद्दल साजरा केला जातो. या शोधासाठी त्यांना १९३० साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. हे शास्त्र शाखेतील भारताला प्राप्त झालेले पहिले नोबेल पारितोषिक होते. शास्त्रातील त्यांच्या या थोर योगदानाबद्दल प्रतिवर्षी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा केला जातो. ‘सायन्स फॉर पीपल अँड पीपल फॉर सायन्स’ अशी २०१९ या वर्षाकरिता या दिवसाची संकल्पना आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शरद आपटे यांनी केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ आणि ‘कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिन’ विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रथम वर्ष विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी ‘दृष्टीकोन’ ही मराठी विज्ञान परिषदे परीषदेमधील प्रथम पारितोषिक विजेती एकांकिका सादर केली. तंत्रज्ञानाचा अनुचित वापर, त्यामुळे नात्यांमधील वाढता दुरावा, युवा पिढीमध्ये वाढता तणाव या विषयावर आधारित होती.

अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जीवनकाळाचा तसेच त्यांच्या संशोधन कार्याचा परिचय करून दिला. तसेच विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन प्रकल्पांसाठी संशोधन करण्याचे आवाहन केले. कै. अरुअप्पा जोशी यांच्या स्मृतींनाही त्यांनी उजाळा दिला.

याप्रसंगी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर विविध स्पर्धामध्ये यशस्वी झालेल्या शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला. कार्यक्रमचे सूत्रसंचालन कु. सायुजा पटवर्धन या विद्यार्थिनीने केले. महाविद्यालयाच्या’सायन्स असोसिएशन’तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिन संपन्न
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिन संपन्न
h
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन आणि कै. अरुअप्पा जोशी स्मृतिदिन संपन्न
Comments are closed.