gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाची ‘पक्षी निरीक्षण सहल’ संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाची 'पक्षी निरीक्षण सहल' संपन्न

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी जबाबदाऱ्यांची जाणीव असावी व त्यांचे निसर्गप्रेम आणि जागृतीची भावना टिकून राहावी यासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या निसर्ग मंडळाद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याकरिता निसर्ग सहली, स्वच्छता मोहीम, प्रभात फेऱ्या, निसर्ग संवर्धनास पूरक व्याख्याने इ. उपक्रम सत्यात्याने आयोजित करण्यात येतात.

तृतीय वर्ष प्राणीशास्त्र विभातातील विद्यार्थ्यांकरिता रत्नागिरी येथील काजरघाटी भागातील महालक्ष्मी मंदिर परिसरात नुकतेच सदर नेचर वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या क्षेत्रात तज्ज्ञ असलेले माजी विद्यार्थी श्री. निखील जांभळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते ‘सेंटर फॉर वाइल्ड लाइफ स्टडीज’ या कार्यकारी संस्थेत एज्युकेटर म्हणून कार्यरत आहेत.

या निसर्ग सहलीत विशेषत: पक्षी निरीक्षणावर भर देण्यात आला. विविध प्रकारचे पक्षी, त्यांची ओळख, त्यांचे नैसर्गिक अधिवास, खाद्य इ. बाबत माहिती दिली तसेच निसर्गात वावरत असताना निसर्गातील प्राणी व वनस्पतींना इजा होऊ नये याकरिता कोणती खबरदारी बाळगली पाहिजे यासाठी त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी फ्लाय कॅचर, सन बर्ड, मुनिया, धनेश, दयाळ, नवरंग, हळद्या यांसारखे विशेष पक्षी याबरोबरच विविध वनस्पतींच्या प्रजाती, अनेक प्राणी, कीटक पाहून आपली अभ्यासपूर्ण निरीक्षणे नोंदवली.

या निसर्ग सहलीत विद्यार्थ्यांसोबत विभागातील प्राध्यापक, विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम सहभागी झाल्या होत्या. या उपक्रमाला प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

Comments are closed.