कोकणातील सडे सध्या रंगीबेरंगी फुलांनी सजलेले आहेत. अशी मनमोहक फुलझाडे पाहण्यासाठी आणि त्याबद्दलची शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी पर्यावरण संस्था आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी रत्नागिरी विमानतळ परिसरात ‘नेचर वॉक’ (निसर्ग सहल)चे आयोजन करण्यात आले आहे. या निसर्ग भ्रमणामध्ये कोकणातील पठारावर आढळणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रदेशनिष्ठ, उच्चप्रदेशनिष्ठ आणि कीटकभक्षी अशा विविध गटांतील वनस्पती आणि रानफुले पाहण्याची संधी यानिमित्ताने सर्व निसर्गप्रेमींना उपलब्ध होत आहे. या सहलीत तज्ञांकडून तेथील वैषिष्टयपूर्ण फुलझाडांविषयी माहिती देण्यात येणार आहे.
शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, सर्व वयोगातील निसर्गप्रेमी नागरिक सदर निसर्ग सहलीत सहभाग घेऊ शकतात. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी लक्ष्मीनगर (मजगाव रोड, रत्नागिरी विमानतळाजवळ) याठिकाणी सकाळी 0८.00 वाजता उपस्थित राहावे. निसर्ग सहलीकरिता अपेक्षित कालावधी २ ते ३ तास इतका आहे.
अधिक माहितीसाठी प्रा. शरद आपटे (९४२३२९२०९५) आणि डॉ. मंगल पटवर्धन (९४०३५०७२४४) वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.