gogate-college-autonomous-updated-logo

मुंबई विद्यापीठाचा निवडणुक साक्षरता कार्यक्रम आज रत्नागिरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात संपन्न

मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना पदव्युत्तर पदवी विभाग आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये निवडणूक साक्षरता कार्यक्रम आज संपन्न झाला या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विश्वंभर जाधव तसेच मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉक्टर कुणाल जाधव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक प्रफुल्ल कुलकर्णी उपस्थित होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाने १०० टक्के साक्षरतेचा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन निवडणूक साक्षरतेचे विविध कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यांची माहिती देताना प्राचार्य प्रफुल्ल कुलकर्णी यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

समाजामध्ये निवडणूक साक्षरता वाढीस लागावी या यातूने मुंबई विद्यापीठाने या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. या शृंखलेची सुरुवात सर्वप्रथम मुंबई विद्यापीठात मुंबई विभागातून करण्यात आली होती. त्त्याचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर रवींद्र कुलकर्णी सर यांनी केले आणि विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांनी निवडणूक साक्षर व्हावे असे आवाहन केले होते. यामध्ये मुंबई विद्यापीठातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थी यांनी निवडणूक साक्षरता मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन कुलगुरूंनी केले होते. त्याला अनुसरून हा कार्यक्रम आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गोखले जोगळेकर महाविद्यालयात संपन्न होत आहे. त्यांच्या आवाहनाला अनुसरून ही श्रूखला अशीच पुढे ठाणे,पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू राहणार आहे. या कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३० शिक्षक त्याचबरोबर ५२ विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे हे मोठं प्रमाण निवडणूक साक्षरतेचे महत्व दर्शवते. निवडणूक साक्षरता ही आज काळाची गरज बनलेली आहे. निवडणूक साक्षरता म्हणजे लोकशाही बाबत सज्ञान राहुन लोकशाहीने दिलेला अधिकार आणि निवडणुकीबाबतची आपली भूमिका पार पाडणे. याबाबतची सविस्तर माहिती देताना डॉक्टर विश्वंभर जाधव यांनी विविध मुद्दे स्पष्ट करताना प्रत्येक महाविद्यालयाने स्वतःचे निवडणूक साक्षरता केंद्र उघडून विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. आजचा महाविद्यालयीन विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक होणार आहे. त्यामुळे त्यांनाही याच वयात ही माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून निवडणुक अधिकाराबाबत व निवडणूक प्रक्रिया बाबत सविस्तर माहिती देणे, निवडणूक अधिकार बजावणे व हे कर्तव्य बजावताना घ्यायची काळजी, त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेतील एकंदर कार्यवाही आणि लोकशाही यांची सविस्तर माहिती आज डॉक्टर विश्वंभर जाधव यांनी दिली. त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आज पर्यंत भारतीय नागरिक म्हणून स्वतःची नोंदणी केलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करून घेण्याचं आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे. त्याचबरोबर विविध तालुक्यांमध्ये हे कार्यक्रम राबवण्यात यावेत असे देखील त्यांनी आवाहन केले आहे.

हा कार्यक्रम मुंबईसह पालघर जिल्ह्यातील सह्याद्री महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला त्याची माहिती देताना प्राध्यापक कुणाल जाधव यांनी मुंबई विद्यापीठातील आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व प्रत्येक महाविद्यालयात विभागा अंतर्गत निवडणुक साक्षरता युनिट स्थापन करून निवडणूक साक्षरतेचे महत्व विविध उपक्रमांद्वारे समाज घटकांना पटवून द्यावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन विभागाच्या वतीने डॉ. सचिन राऊत, किरण पाटील, संतोष पाटील, अविनाश खानविलकर तर महाविद्यालयाच्या वतीने डॉ. शिवराज गोपाळे व सुत्र संचालन प्रा. सुर्यकांत माने यांनी केले.

Comments are closed.