gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागाचे उल्लेखनीय यश

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे मुंबई विद्यापीठाच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या समारंभात कु. शामली सावंत, कु. प्रणिता टिपुगडे, कु. दिव्या पाटील, कु. श्रीनिधी सावंत, कु. मृण्मयी पतंगे यांना ‘होमी भाभा सेंटर सायन्स एज्युकेशन’ द्वारा आयोजीत ‘एकक्सपिरीमेंतटल फिजिक्स’ कार्यशाळेतील सहभागासाठी सन्मानित करण्यात आले. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी विनिता वालावलकर आणि प्रियांका पेंढारी यांना होमीभाभा सायन्स सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमार्फत घेण्यात येणाऱ्या ‘नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन अंडरग्राज्यूएट सायन्स भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र’ उपक्रमातील सहभागासाठी सन्मानित करण्यात आले. तृतिय वर्षातील दिव्या पाटील हिला ‘साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लिअर फिजिक्स, कोलकाता’ मार्फत घेण्यात येणाऱ्या फेलोशिप प्रोग्रॅममधील सहभागासाठी गौरविण्यात आले. सदर विद्यार्थिनीला डॉ. पद्मजा मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली मुलभूत विषयावर अडीच महिने संशोधन करण्याची संधी मिळाली.

भौतिकशास्त्र विभागाच्या या सुयशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. महेश बेळेकर यांनी विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.