gogate-college-autonomous-updated-logo

राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून एड्स जनजागृती उपक्रम सहभाग

गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वायत्त रत्नागिरी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागतर्फे स्वयंसेवकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील एच.आय.व्ही माहिती व तपासणी केंद्र (ICTC) येथे भेट देऊन एडस् व गुप्तरोग जनजागृती उपक्रमात सहभाग घेतला.

या भेटीदरम्यान स्वयंसेवकांनी एचआयव्ही – एड्स विषयक जनजागृती केली, घोषवाक्ये दिली आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी आरोग्यविषयक चर्चा केली. यामधून स्वयंसेवकांना एचआयव्ही – एड्स प्रतिबंध, निदान व उपचार याबाबत सखोल माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आयसीटीसी विभाग, रेड रिबन क्लब राष्ट्रीय सेवा योजना विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून ICTC विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये “जागरूक समाज – निरोगी समाज” हा संदेश देण्यात आला. एन.एस.एस. स्वयंसेवकांनी एचआयव्ही – एड्स मुक्त समाजासाठी जनजागृती हेच शस्त्र” या घोषणांनी परिसर दुमदुमवला. स्वयंसेवकांना जनजागृती पत्रकांचे वितरण करण्यात आले. यावेळी आयसीटीसी विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी सचिन पाटील, समुपदेशक सतीश कांबळे, समुपदेशक राहुल खरात, एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा सचिन सनगरे आणि स्वयंसेवक उपस्थित होते.

Comments are closed.