अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात ‘पर्यावरण जाणीव जागृती मंडळाचे’ उद्घाटन संपन्न नुकतेच संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सहयाद्री संवर्धन व संरक्षण संघटनेच्या संस्थापिका सोनल प्रभुलकर याची उपस्थिती लाभली होती. तसेच उपप्राचार्या विशाखा सकपाळ, पर्यवेक्षक प्रा. अनिल उरुणकर आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रभुलकर यांनी कोयना अभयारण्यातील जैवविविधता, धनगरवाडे आणि आपल्या संस्थेने केलेल्या कामांचा आढावा घेतला. तसेच स्लाईड शोच्या माध्यमातून विविध प्राणी, पक्षी, पर्यावरण याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी महाविद्यालयाच्या ‘पर्यावरण जाणीव जागृती मंडळा’ला शुभेच्छा व्यक्त केल्या.
त्यांच्या संस्थेच्या कार्याने विद्यार्थी प्रेरित झाले आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी पर्यावरणप्रेमी, मंडळ सभासद शिक्षक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक प्रा. स्मिता पाथरे, प्रा. रणनवरे, प्रा. दातार, प्रा. कांदळकर, प्रा. लेले, प्रा. शिंगाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. एस. आय. वस्ता यांनी केले.