gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन

Womens Development Program

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे विद्यार्थीनिंकरिता दि. ८ सप्टेंबर रोजी ‘फोर्मा दि प्रोफेशनल वर्कशॉप फॉर युथ’ या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अस्मिता इमेज कन्सल्टंन्सी या मुंबईतील संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षिका अश्विनी नेवे आणि डॉ. कस्तुरी नाईक यांनी सहभागी विद्यार्थीनिंना व्यावसायिक क्षेत्रात शिरण्यासाठी आवश्यक कौशल्याबाबत मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे यावर्षी विद्यार्थीनिंना नोकरी अथवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक कौशल्ये देण्यावर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेदरम्यान व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग असलेल्या वेशभूषेपासून कॉर्पोरेट जगात आवश्यक शिष्टाचार, मुलाखतीची तयारी, समूह चर्चेत कशाप्रकारे सहभागी व्हावे याविषयी छोट्या-छोट्या उपक्रमांतून उपस्थित तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आपले मोनोगत व्यक्त करताना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी व्यावसायिक जगताला आत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये विद्यार्थीनिंनी आत्मसात करणे खूप गरजेचे असून ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी तर आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी देवस्थळी यांनी केले. सदर कार्यशाळेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. कार्यशाळेच्या आयोजनाकरिता प्रा. अश्विनी देवस्थळी आणि महिला विकास कक्षाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Womens Development Program
Womens Development Program
Comments are closed.